
हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ (केंद्र रायपाटण ) बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
- सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षण परिषदेत केंद्रातील शिक्ष कांनी विविध शैक्षणिक विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्श नाचा लाभ घेतला.

- शिक्षण परिषदेच्या माध्यमातून निपुण अभियान, शाळानि हाय आढावा,विविध शैक्षणिक पोर्टल तसेच शिक्षणप्रवाहा तील बदल याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी नवन वीन उपक्रमांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
- परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘निपुण अभियान शाळानिहाय आढावा’ तसेच ‘विविध पोर्टल व शिक्षणप्रवाहातील बदल’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
- या सत्रासाठी केंद्रसमन्वयक श्री. किशोर शिनगारे यांनी मार्गदर्शन केले.
- दुसऱ्या सत्रात वर्गप्रक्रियेतील सकारात्मक व सुधारात्मक बाबी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शन या विषयांवर चर्चा करण्यात आली.
- यावेळी श्री.सुधाकर जाधव (रायपाटण नं.३), सौ.दिपाली धावडे (रायपाटण नं. १ ) आणि सौ.शारदा रेडेकर (रायपा टण नं. ५) यांनी मार्गदर्शन केले.
- तिसऱ्या सत्रात अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नि योजन या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
- श्री. किशोर चव्हाण (धामणपे) यांनी सर्व वर्गशिक्षक व विषयशिक्षकांना मासिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
- चौथ्या सत्रात शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना व पाठपुरावा या विषयावर माहिती देण्यात आली.
- यावेळी सौ. मानसी सुर्वे ( परुळे नं. ३) यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी पालक व शिक्षकांचा सहभाग वाढविण्या च्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली.
- पाचव्या सत्रात My Gooru App तसेच Room to Read उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली. या सत्रात श्री.शरद वाशिंबे परुळे नं. ३) आणि श्री. सुनील भांडेकर यांनी मार्गदर्शन केले.
- डिजिटल साधनांचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी वापर करू न विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला अधिक परिणामकारक बन विण्याबाबत माहिती देण्यात आली.
- या शिक्षण परिषदेत प्रशासकीय मार्गदर्शन, मासिक काम काजाचे संकलन, अहवाल लेखन आदी बाबींवरही मार्गद र्शन करण्यात आले.
- परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकी य कामकाजाबाबत आवश्यक दिशा मिळाली.
- कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अहवाल लेखन सौ.अश्विनी माने, मासिक काम संकलन – परमेश्वर धुळे, आभार –श्री.रंगराव चौगुले यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच फोटो व व्हिडिओ शूट -श्री.शरद वाशिंबे व श्री. सुनी ल भांडेकर यांनी केले.
- या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना आपल्या अ ध्यापन पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावी वापर करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
- शिक्षकांनी परिषदेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध विष यांवरील चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






