
लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात; केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जिल्हा वार्षिक यो जना सन २०२३-२४ अंतर्गत नागरी सुविधा विशेष अनुदा नातून लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली ओझोन घंटागाडी गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायत का र्यालयाच्या आवारात धूळ खात उभी असल्याने केळवली ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
- एकीकडे घंटागाडी वापराविना पडून असताना ग्रामपंचाय त हद्दीतील ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून कचरा अद्याप ही रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

- केळवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वच्छतेसाठी घंटागाडी चा वापर अपेक्षित असताना संबंधित वाहनाचा गेल्या ती न वर्षांत प्रभावी वापर झालेला नसल्याचा आरोप ग्राम स्थांकडून करण्यात येत आहे.
- त्यामुळे लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आले ल्या या वाहनाचा उपयोग नेमका कशासाठी झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
- दरम्यान, ग्रामपंचायत परिसरातील काही कोंबडी व्यावसा यिकांकडून व्यवसायातून निर्माण होणारी घाण परिसराती ल ओढ्यांमध्ये टाकली जात असल्याने दुर्गंधी आणि अस्व च्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
- ओढ्यांमध्ये कचरा व घाण साचल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. ही कुत्री रस्त्याने ये-जा क रणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नाग रिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- स्वच्छता राखण्यासाठी उपलब्ध असलेली घंटागाडी वाप राविना पडून असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी क चरा साचत असल्याने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थे वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- लाखो रुपयांचा निधी खर्च करून खरेदी केलेले वाहन ती न वर्षांपासून वापराविना पडून राहिल्याने त्याची झीज होत असून सार्वजनिक निधीचा हा अपव्यय असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

- नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, घंटागा डीचा वापर तातडीने सुरू करावा आणि परिसरातील कच रा व ओढ्यांमधील घाणीची विल्हेवाट लावून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






