
कंडारी येथील भैरवनाथ मंदीर चोरी चा तपास तात्काळ करून दोषींवर कारवाई करावी ; अन्यथा कंडारी ग्रामस्थांचा अंदोलनाचा इशारा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि ३ मंदीर चोरी प्र करणी तीन दिवस झाले तरी चोर सापडत नसले च्या निषे धार्थ कंडारी ग्रामस्थ अक्रमक झाले असून अंदोलन कर ण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
- याबाबत काल दि ३ रोजी तहसीलदार परंडा यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनावर. श्री काळ भैरवनाथ जोगे श्वरी मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेचा निषेध व दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याबाबत व आमरण उपोष ण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- तीर्थक्षेत्र मौजे कंडारी, ता. परंडा, जि. धाराशिव येथील श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात दि ३० सप्टेंबर २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.
- या चोरीमध्ये मंदिरातील दागिने व इतर मौल्यवान वस्तू चो रीस गेल्या असून, अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे देवीचा पवित्र मुखवटादेखील चोरीस गेला आहे.
- ही घटना केवळ चोरीची घटना नसून, हजारो भाविकांच्या श्रद्धेला व धार्मिक भावनांना धक्का देणारी अत्यंत गंभीर बाब आहे.
- या घटनेमुळे कंडारी ग्रामस्थांच्या व भाविकांच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या असून, सर्वत्र संताप व अस्वस्थ तेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- हा विषय धार्मिकतेचा आहे, श्रद्धेचा आहे आणि गावाच्या अस्मितेचा आहे.
- त्यामुळे सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्र शासन व पोलिस यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी अ शी मागणी करण्यात आली आसून पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
- 1. मंदिरातील चोरीच्या घटनेचा तात्काळ तपास करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी.
- 2. चोरीस गेलेले दागिने, मौल्यवान वस्तू तसेच देवीचा पवित्र मुखवटा तातडीने शोधून परत मिळवावा.
- 3. घटनेमागील सर्व संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
- 4. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात यावी.
- 5. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना व सीसीटीव्ही/प्रकाश व्यवस्था करण्यात यावी.
- 6. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून भाविकांना व ग्रामस्थांना तपासाबाबत योग्य माहिती देण्यात यावी.
- सदर घटनेच्या निषेधार्थ व दोषींवर तात्काळ कारवाई व्हा वी या मागणीसाठी दि. 7 ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, कंडारी येथे भाविकांच्या वतीने शांततामय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
- हे आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून, प्रशासनाने आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
- अशी मागणी केली असून निवेदनावर सागर शिंदे, अमोल तिंबोळे ,रामदास डांगे , सोन्या घोगरे ,हौसराव देशमुख ,सु रज देशमुख ,लक्ष्मण तिंबोळे ,तुकाराम देशमुख, समाधान तिंबोळे इत्यादी सह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






