
कंडारी येथील काळ भैरवनाथ मंदिरात चोरी; निषेधार्थ आज ‘कंडारी गाव’ कडकडीत बंद.!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मौजे कंडारी येथील ग्राम स्थांचे आराध्य दैवत श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील देवाचा पवित्र मुखवटा आ णि इतर धार्मिक वस्तू लंपास केल्याची गंभीर घटना घड ली आहे.
- या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि दोषींवर ता त्काळ कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज, सोम वार दि. ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी कंडारी गाव कडकडी त बंद ठेवण्यात आले आहे.

- मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरामध्ये ही चोरीची घटना घडली.
- गावाचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातून देवाचा मुखवटा आणि धार्मिक साहित्य चोरीला गेल्याचे समोर येताच संपूर्ण कंडारी गावात एकच खळबळ उडाली.
- या घटनेमुळे गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
- या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी यासाठी आ ज कंडारी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला (सरपंच/ग्रामसेवक) अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.
- या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
- सखोल चौकशी व अटक: चोरीच्या घटनेची सखोल चौक शी करून दोषी व्यक्तींना तात्काळ शोधून काढण्यात यावे.
- वस्तूंची पुनर्प्राप्ती: चोरीस गेलेला देवाचा मुखवटा व इतर धार्मिक वस्तू लवकरात लवकर हस्तगत करून मंदिरात परत मिळवाव्यात.
- CCTV फुटेज तपासणी: मंदिर परिसरातील उपलब्ध CCTV फुटेज व इतर पुराव्यांची कसून तपासणी करून गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करावी.
- सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे: मंदिराच्या सुरक्षेची पाहणी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायम स्वरूपी सुरक्षा व्यवस्था कडक करावी.
- ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, हा ‘कं डारी बंद’ शांततामय व लोकशाही मार्गाने केलेला निषेध असून, गावात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.
- मात्र, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने या प्रक रणाचा तपास करून गुन्हेगारांना लवकरात लवकर गजा आड करावे, अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
- या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण परंडा तालुक्यातून हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. कंडारी गावातिल ल हान थोर नागरीक गाव बंध करून मंधीरा पूडे टाम बसले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






