माळशिरस येथील अपघातात पाच वर्षीय बालकाचा अंत झाला तर एक महिलेसह दोन जण जखमी.

  • प्रतिनिधी : शकील मुलांनी :- माळशिरस येथील अपघा तात पाच वर्षीय बालकाचा अंत झाला तर एक महिलेसह दोन जण जखमी झाले .
  • याबाबतची माळशिरस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दुचाकी गाडी नं. एम एच 45 एक्स 3290 ही यादव पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्या साठी थांबले होते.
  • पाणी पिऊन गाडी रस्त्यावर आल्यानंतर नातेपुते कडून येणाऱ्या चारचाकी गाडी नं. एम एच 12 एफ 9429 या गाडीने पाठी मागून येऊन जोराची धडक दिल्याने मुलगा अविश धीरज जाधव रा. निमगाव ता. माळशिरस जिल्हा सोलापूर याला जोराची धडक बसल्याने तो जागीच ठार झाला.
  • उज्वला बाळासाहेब मगर रा. निमगाव,शरद दिलीप माने रा.कुरवली ता. इंदापूर जिल्हा पुणे हे दोघे जखमी झाले आहेत.
  • सदर दुर्घटनेची माळशिरस पोलिसांकडून पुढील तपास चालु आहे.
  • मयत अविश धीरज जाधव हा मुलगा जखमी शरद दिली‌ प माने यांनी दत्तक म्हणून घेतले होते.या घटनेमुळे दत्तक पुत्र हा कागदावरच दत्तक पुत्र राहिला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
  • यादव पेट्रोल पंपाजवळील चौक हा मृत्यूचा सापळा बन ला असून याठिकाणी उड्डाणपूल होण्याची मागणी वाहन धारक तसेच नागरिकांतून होत आहे.
  • लवकरात लवकर शासनाने याची वेळीच दखल घेणे आव श्यक अन्यथा आणखी हा चौक मृत्यू चा चौक होईल अ‌ शी चर्चा संतप्त नागरिक करताना दिसत होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles