कळसवली,तळेकरवाडी येथे ११ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील कळ सवली, तळेकरवाडी येथे राधाकृष्ण सेवा मंडळाच्या वती ने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायण महापूजा अ त्यंत भक्तिभावाने व उत्साहात आयोजित करण्यात आली आहे.
  • सदरची महापूजा सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
  • या सोहळ्यास मा.श्री.किरण (भैया) सामंत (लांजा-राजा पूर-साखरपा विधानसभा आमदार) यांची प्रमुख उपस्थि ती लाभणार असून, मा.श्री.प्रतिकजी मटकर (जि. परिषद सदस्य), मा.अपूर्वा ताई सामंत (शिवसेना युवा नेतृत्व),मा. श्री.गौतमजी जाधव (पंचायत समिती सदस्य), तसेच मा. श्री.देवेश तळेकर (सरपंच, कळसवली) आणि मा.श्री.स्व प्निल गणपत मिरजोळकर (प्रो.प्रा.वनिता एंटरप्राइजेस) या मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे.
  • या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व मनोरं जनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  • यामध्ये क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम तसेच रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून, गावातील लहान ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र ठर णार आहेत.
  • नमनप्रेमींसाठी विशेष आकर्षण म्हणून श्री देवी वाघजाई भरारी नाट्य नमन मंडळ, ओझरे खुर्द (देवरुख) यांचे बहु रंगी नमन सादर होणार असून, हा कार्यक्रम रात्री १०.३० वाजता रंगणार आहे.
  • तसेच सर्व उपस्थित भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसा दाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
  • या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन राधाकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles