परंडा नगरपालिकेची ८ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा; शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबत होणार निर्णय.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- शहरातील विविध चौकांम ध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी परंडा नगरपालिकेने आगामी ८ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
  • नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी शहरातील शिवाजी चौक येथे शिवप्रेमींनी छत्र पती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अचानक पणे उभारला होता.
  • या पार्श्वभूमीवर आणि शहरातील विविध भागांत महापुरु षांचे पुतळे उभारण्याची मागणी लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
  • या विशेष सभेत प्रामुख्याने खालील ठिकाणांबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे:
  • छत्रपती शिवाजी महाराज चौक (अश्वारूढ पुतळा)
  • छत्रपती संभाजी महाराज चौक
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक
  • महात्मा फुले चौक
  • टिपू सुलतान चौक
  • महाराणा प्रताप चौक
  • निळा झेंडा चौक आणि इतर महत्त्वाचे चौक.
  • “शहरातील विविध चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारले जावेत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती.
  • या विषयाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी आणि रीतसर ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल,” असे नगराध्यक्ष जाकीर सौ दागर यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयाकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles