सैनिकांच्या परिवारासोबत दिवाळी उत्साहात साजरी.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- देशभरात दिवाळी हा स ण मोठया उत्साहात साजरा केला जातो. आपण आपल्या परिवारासोबत या सणाचा आनंद घेत असतो.
  • मात्र सीमेवर देश रक्षणाचे कार्य करणारे सैनिक या सणात सहभागी होऊ शकत नसल्याने त्यांच्या कुटुंबासोबत दि वाळी साजरी व्हावी.
  • या हेतूने गेली दहा वर्षापासून समस्त हिंदू आघाडीचे सं स्थापक मिलिंद एकबोटे यांच्या वतीने सैनिकांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते.
  • देशसेवेत सैनिक म्हणून कार्यरत असणाच्या खेड तसेच शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ,मांडवगण फराटा, शिख रापूर,निमगाव म्हाळुंगे,कोरेगाव भीमा,धामारी,कान्हूर मेसा ई, घोरपडी, खराडी अशा अनेक गावात जाऊन सैनिक स न्मान दिवाळी साजरी करण्यात आली.
  • अनेक तरुणांनी सहभाग घेत सैनिकांच्या घरासमोर रांगो ळी काढली, दारावर तोरण बांधले, दारात पणत्या लावून सैनिकांच्या परिवाराला मिठाई वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
  • भारत माता की जय,जय जवान जय किसान , वंदे मातरम् ,छत्रपती शिवाजी महाराज की जय,भारतीय सैनिकांचा विजय असो अशा घोषणांनी गावचा परिसर दुमदुमून गे ला होता.
  • यावेळी शिवाजी अंबिके,हनुमंत तापकीर,शिवम सोनवणे, प्रतीक शर्मा,नरहरी माळवे,हर्षित आढाव,स्वप्नील वाघमारे सह बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • या उपक्रमामुळे सैनिकांच्या परिवारातील व्यक्तींच्या चेह ऱ्यावरील आनंद वेगळेच समाधान देत असल्याचे मुख्य संयोजक मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles