ज्योती चव्हाण यांनी स्वीकारला भूम-परंडा-उपविभागीय महसूल अधिकारी पदाचा कार्यभार.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- भूम/परंडा/:भूम/ परंडा उपविभागाच्या नवनवीन उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांत अधिकारी) म्हणून ज्योती चव्हाण यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
  • पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय वर्तुळातून तसेच नागरिकांमधून त्यांचे स्वागत होत आहे. भूम, परंडा आणि या दोन तालुक्यांची जबाबदारी चव्हाण यांच्या खांद्यावर आली आहे.
  • हा परिसर भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि शेतीप्रधान अस ल्याने महसूल प्रशासनासमोर विविध आव्हाने असतात.
  • पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जन सामान्यांचे प्रश्न वेळेत सोडवण्याला आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याला आपले प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले.
  • दोनेही तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राख णे, शेतकरी व सामान्य नागरिकांची महसूल विभागातील प्रलंबित कामे गतीने मार्गी लावणे, तसेच प्रशासकीय काम काजात पारदर्शकता आणणे यावर त्यांचा प्रामुख्याने भर राहणार आहे.
  • चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे उपविभागातील रखडलेल्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक भूम परंडा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles