
गीतकार गोपाळ कारंडे संकल्पित नमन’ लवकरच जवळच्या नाट्यगृहात.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- नमन म्हणजे केवळ एक लोककला नाही, तर आपल्या कोकणच्या मातीचा सुगंध,आपल्या पूर्वजांची परंपरा आणि गावच्या संस्कृती ची जिवंत ओळख आहे.
- देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, गणपतीचे स्मरण करू न सुरू होणारी ही कला पिढ्यान्पिढ्या आपल्या गावा गावांतून जपली गेली.
- ओव्या, गणनाट्य, पारंपरिक गीते, गौळणी, मावशीचे वि नोदी प्रसंग आणि शृंगारिक पदे यांनी नमनाला एक आग ळेवेगळे लोकनाट्यरूप दिले.

- ही कला रंगमंचावर जन्मलेली नाही,ही जन्मली आहे आ पल्या कोकणच्या मातीत… गावच्या अंगणात…देवाच्या चरणी…आणि आपल्या माणसांच्या मनात.
- आम्ही लोककलेचे वारसदार, आम्ही परंपरेचे पाईक.
- हीच आमची ओळख, पारंपरिक गीतांचा सुरेल संगम, मृदुंगाच्या तालावर, नमनाच्या रंगमंचावर पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा घेऊन गीतकार गोपाळ कारंडे आपल्या जवळच्या नाट्यगृहात नमन, द कोकणी फोक आर्ट घेऊन येत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/





