दुर्गम नायरी भागातील दहावीच्या दिपाली बावदानेनी तालुका क्रीडा स्पर्धेत उंच उडीत सलग तिसऱ्या वर्षी ‘हॅट्रिक’ करत पटकावला प्रथम क्रमांक.

  • प्रतिनीधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील नाय रीसारख्या अत्यंत दुर्गम व ग्रामीण भागातील प्रतिकूल प रिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनती च्या जोरावर यशोशिखरे गाठायला सुरुवात केली आहे.
  • प्रचित गड माध्यमिक विद्यालय,कारभाटले येथे इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी दिपाली सखाराम बावदाने हिने तालुका क्रीडा स्पर्धेत आपल्या दै दीप्यमान कामगिरीने संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
  • दिपालीने तालुका क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगट मुलींच्या उंच उडी (High Jump) प्रकारात उत्कृष्ट क्रीडाकौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.
  • विशेष म्हणजे, या क्रीडा प्रकारात सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून तिने ‘हॅट्रिक’ साधण्याचा अभूतपूर्व विक्र म आपल्या नावावर केला आहे.
  • उंच उडीतील सुवर्ण कामगिरीसोबतच तिने मैदानी प्रकारा तील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही चमकदार काम गिरी करत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
  • इयत्ता १० वीच्या अभ्यासाचा ताण आणि दुर्गम नायरी भा गातील भौगोलिक आव्हाने असतानाही, दिपालीने दाखव लेली ही जिद्द आणि क्रीडा क्षेत्रातील सातत्य खरोखरच कौतुकास्पद व इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
  • दिपालीच्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षके तर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी तिचे भरभरून अभिनंदन केले आहे.
  • तालुका स्तरावरील या यशस्वी कामगिरीनंतर तिची जि ल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, आगामी स्पर्धे तही ती अशीच यशोशिखरे सर करेल, या विश्वासासह ति च्या पुढील उज्ज्वल वाटचालीस उदंड शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles