देवाचे गोठणेतील बा.ल.साठे विद्यालयाची तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत दमदार कामगिरी चार खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. 

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर तालुका तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडल्या.
  • या स्पर्धेत बा.ल.साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, देवाचे गोठणे येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदव त विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.
  • विजेत्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
  • १९ वर्षे वयोगट – कुमार – दुर्गेश संजय नाटेकर- प्रथम क्रमांक उंच उडी, लांब उडी,
  • तनिष्क भिकाजी मल्हार – द्वितीय क्रमांक, उंच उडी वर्षे वयोगट-
  • निहार नितीन नवाळे – प्रथम क्रमांक १०० मीटर धावणे,
  • विराज विलास आंबेकर – द्वितीय क्रमांक १०० मीटर धावणे,
  • या चारही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चारही खेळा डूंची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
  • त्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
  • या यशासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री.महाले सर यांचे मार्गदर्शन लाभले, तर क्रीडा मार्गदर्शक श्री.लाड सर यांनी विशेष मेहनत घेतली.
  • विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्म चारी तसेच विद्यार्थी यांनी विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles