कंडारी मंदिरातील चोरीची बातमी प्रसिद्ध केल्याने पत्रकारांची बदनामी; सायबर चौकशीची मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :-कंडारी येथील मंदिरा तील चोरीप्रकरणी बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्र कारांची निनावी ई-मेलद्वारे बदनामी केली जात असल्या चा आरोप करण्यात आला आहे.
  • या प्रकरणाची सायबर सेलमार्फत सखोल चौकशी करून संबंधितांचा शोध घ्यावा, या मागणीसाठी परंडा तालुक्या तील पत्रकारांनी गुरुवारी (ता. १५) जिल्हाधिकारी, धारा शिवचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित प्रशासकीय अधि काऱ्यांना निवेदन देण्यात आले.
  • कंडारी येथील मंदिरात झालेल्या चोरीची बातमी पत्रकारां नी लोकहिताच्या दृष्टीने प्रसिद्ध केली होती.
  • मात्र, त्यानंतर खोट्या अथवा इतर व्यक्तींच्या नावाचा वा पर करून ई-मेलद्वारे बदनामी केली जात असल्याचे निवे दनात म्हटले आहे.
  • या प्रकारामुळे पत्रकारांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असून, पत्रकारितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
  • मंदिरातील चोरीच्या तपासाचीही मागणी
  • कंडारी मंदिरातील चोरीप्रकरणाचा तपास तातडीने आणि निष्पक्षपणे पूर्ण करावा.
  • तसेच आंबी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व क र्मचाऱ्यांकडून तपासात निष्काळजीपणा किंवा टाळाटाळ झाली आहे का, याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी.
  • दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करा वी, अशी मागणी पत्रकारांनी केली.
  • ई-मेल पाठविणाऱ्याचा शोध घ्या
  • संबंधित ई-मेलचा स्रोत, तो पाठविणाऱ्या व्यक्तीची ओळ ख आणि त्यामागील हेतू शोधण्यासाठी तांत्रिक तपास करावा.
  • उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करून सत्य स मोर आणावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
  • पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांचा शोध घेऊन योग्य कार वाई करावी आणि मंदिरा मधील चोरीप्रकरणातील तपासाला गती द्यावी, अशी मागणी परंडा तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.
  • यावेळी परंडा तालुक्यातील पत्रकार मुजिब काझी, ताना जी घोडके, आप्पासाहेब शिंदे, गोरख देशमाने, संतोष शिं दे, नूरजहाँ शेख, रणजित शिंदे, समीर ओव्हाळ, विजय मेहेर, फारुख शेख, अमोल निकाळजे, रावसाहेब गायक वाड,शंकर घोगरे, रामदास गुडे , बनसोडे राहुल आदी सह पत्रकार उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles