निगडीतील मॉडर्न हायस्कुलला थ्रो बॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट.

  • प्रतिनीधी : शिवाजी अंबिके :-जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शासकीय जिल्हास्तरीय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मॉडर्न हायस्कुलच्या दोन्ही संघानी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • या घवघवीत यशासह या संघाची विभागीय थ्रोबॉल स्पर्धे साठी निवड झाली आहे.
  • या विजेत्या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक उमर शेख आ णि गंगाधर सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
  • खेळाडूंनी मैदानावर दाखवलेले कौशल्य, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच हे यश संपादित करता आले.
  • जिल्हास्तरावर अजिंक्यपद मिळवून सोलापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शाळा प्रशासनाने विशेष कौतुक केले.
  • या यशस्वी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवा ह प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मान सिंग साळुंके,मुख्याध्यापिका वंदना सोनोने,व्हिजिटर प्रमो द शिंदे, तसेच पर्यवेक्षक विजय पाचारणे व राजीव कुटे यांनी अभिनंदन केले आणि सोलापूर येथील आगामी वि भागीय स्पर्धेतही उत्तम यश संपादन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles