शासनाची वाट न पाहता वहाळावर बांधला तात्पुरता साकव; खाडेवाडीतील विजय म्हादये यांनी ठेवला सर्वांसमोर आदर्श.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे रायपाटण येथील खाडेवाडीचे सुपुत्र आणि मोतादेवी उत्क र्ष मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते श्री विजय म्हादये यांनी आप ल्या घराकडे जाणाऱ्या रहदारीच्या वाटेवरील वहाळावर कच्च्या स्वरुपात साकव तयार केला.
  • काम कोणतेही असो परंतु ते मनापासून करण्याची जिद्द हवी श्री.म्हादये यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • विजय म्हादये हे नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक असतात गणपतीत आपल्या गावी रायपाटण मधील खाडेवाडी येथे आले होते.
  • त्यांच्याघराकडे जाणाऱ्या वाटेवरील वहाळात पावसाळ्या त भरपूर पाणी येत असल्याने वाडीतील मंडळींना त्यांच्या कडे जाता येत नसे.
  • येथील छोटेखानी वहाळावर पूल व्हावा यासाठी त्यांनी प्र शासनाकडे पाठपुरावाही केला परंतु यश आले नाही तरी ही त्यांनी हार न मानता यावर तोडगा म्हणून भाऊबंदांना एकत्र केले.
  • बांबू तर बाजूच्या परसवात होतेच त्याची कामटे पाडली आणि रानातून सरळसोट वासे आणून सर्वांच्या मदतीने वहाळावर आडवे घातले आणि महत्प्रयासाने येथे साकव तयार केला.
  • त्यामुळे वहाळाला पूर आला तरी वाडीतील मंडळींना या साकवा वरुन जाता येता आले.
  • त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून एखाद्या का मासाठी प्रशासनावर अव लंबून न राहता तात्पुरत्या स्वरू पात आपण त्यावर उपाय योजना करुन तो प्रश्न सोडवू शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles