रोसा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समीर ओव्हाळ, तर उपाध्यक्षपदी विजयकांत गिरी यांची बिनविरोध निवड…! ग्रामस्थांकडून जंगी सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- येथील जिल्हा परि षद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अ ध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच उत्साहा त पार पडली.
  • यामध्ये अध्यक्षपदी समीर ओव्हाळ तर उपाध्यक्षपदी वि जयकांत गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  • या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वती ने जाहीर सत्कार करण्यात आला असून, गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
  • शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे,भौतिक सुविधांचा विकास करणे आणि विद्या र्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शालेय व्यवस्थापन समिती नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते.
  • याच पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी शा ळेच्या कायापालटासाठी आणि प्रगतीसाठी अहोरात्र प्रय त्न करावेत, अशी अपेक्षा उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
  • या कौतुक सोहळ्याप्रसंगी फैजल शेख, युवराज पाटील, र णजीत पाटील, हनुमंत पाटील, प्रदीप गाडगे, पांडुरंग नल वडे, पांडुरंग पाटील, मंगेश गोडगे, अजित गोडगे, अच्युत जगताप, अशोक जगताप, रविकिरण जगताप, राम कदम, प्रवीण जगताप, ज्ञानेश्वर कदम, रिलस्टार अंकुश गायकवा ड, स्वप्नील जगताप, राहुल जगताप, आदित्यभाई गिरी, द त्तूनाना साबळे, महेबुब शेख, ऋषिकेश पाटील, मयूर गोड गे आणि संजय गिरी यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उप स्थित होते.
  • नवनिर्वाचित पदाधिकारी समीर ओव्हाळ व विजयकांत गिरी यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि समिती च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास शा ळेच्या शैक्षणिक दर्जाला मोठी चालना मिळेल, असा वि श्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्र संचालन फैजल शेख यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles