
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांचे सांत्वन; कै.भिवराबाई सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महाराष्ट्र राज्याचे मा जी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदा रसंघाचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मातो श्री कै. भिवराबाई जयवंतराव सावंत यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
- या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजाचे नेते व संघ र्षयोद्धा मनोजदादा जरांगे-पाटील यांनी तातडीने प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊ न सावंत कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

- या भेटीदरम्यान मनोज जरांगे-पाटील यांनी दिवंगत मातो श्री भिवराबाई सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करू न भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
- तसेच, सावंत कुटुंबीयांचे सांत्वन करत आपल्या तीव्र संवे दना व्यक्त केल्या.
- मराठा आरक्षणाच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्रात ज्या शेक डो मराठा बांधवांनी आणि तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
- अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चाने खूप मोठा आर्थिक आणि सामाजिक आधार दिला आहे.
- सावंत साहेबांच्या याच सामाजिक योगदानाची आणि स माजाप्रती असलेल्या जाणिवेची दखल घेत, या कठीण व दुःखाच्या प्रसंगी सावंत कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी मनोजदादा जरांगे-पाटील यांनी स्वतः त्यां च्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली.

- यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही कै.भिवराबाई सावंत यांच्या स्मृतीस उजाळा दिला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






