कौडगावात ऊसतोड मजुरांना डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार; परंडा पोलिसांची धडक कारवाई, ४२ मजुरांची सुटका….!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-धाराशिव जिल्ह्याती ल परंडा तालुक्यातील कौडगाव येथे ऊसतोडणी मजुरांना डांबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने वेठबिगारी करून घेतल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
  • रोजगाराचे मोठे आमिष दाखवून परराज्यातून आणलेल्या मजुरांना बंदिस्त खोलीत डांबून, मारहाण व धमक्यांच्या जोरावर ऊसतोडणी करण्यास भाग पाडले जात होते.
  • या अमानुष प्रकाराची गुप्त माहिती मिळताच परंडा पोलि सांनी तातडीने धडक कारवाई करत तब्बल ४२ मजुरांची नरकातून सुखरूप सुटका केली आहे.
  • या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
  • मोबाईल काढून घेतले; अमानुष स्थितीत कोंडले
  • मिळालेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई आणि ठाणे येथील रेल्वे स्थानकांवरून या परप्रांतीय मजुरांना चांगला रोजगा र देण्याचे आमिष दाखवून परंडा तालुक्यातील कौडगाव येथे आणण्यात आले होते.
  • मात्र, येथे पोहोचताच मजुरांचे मोबाईल फोन आणि इतर साहित्य बळजबरीने काढून घेण्यात आले. त्यांना एका बं दिस्त खोलीत डांबून ठेवले जात होते.
  • रोज सकाळी त्यांना केवळ ऊसतोडणीच्या कामासाठी बा हेर काढले जाई आणि संध्याकाळी काम संपताच पुन्हा त्याच खोलीत कोंडले जात असे.
  • मजुरांना ठेवण्यात आलेल्या खोलीत मूलभूत सुविधांचाही घोर अभाव होता.
  • त्यांना शौचालयासाठी बाहेरही जाऊ दिले जात नव्हते, तर खोलीतच एका बादलीचा वापर करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
  • विरोध करणाऱ्यांना बेदम मारहाण
  • या अमानुष वागणुकीला कंटाळून ज्या मजुरांनी काम कर ण्यास विरोध केला किंवा आपल्या गावी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
  • तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्यामुळे सर्व मजूर अत्यंत भयभीत झाले होते. “आम्हाला काही नको, फक्त आमच्या गावी सुखरूप जाऊ द्या,” अशी आर्त विन वणी सुटका झालेल्या मजुरांनी पोलिसांकडे केली.
  • पोलिसांची धाडसी कारवाई आणि पुढील तपास
  • कौडगाव परिसरात मजुरांवर अन्याय होत असल्याची गो पनीय माहिती मिळताच परंडा पोलिसांनी कसलाही विलं ब न लावता घटनास्थळावर धाड टाकली.
  • पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व ४२ मजुरांची सुटका क रून त्यांना सुरक्षित स्थानी हलवले आहे.
  • या मोठ्या कारवाईनंतर आता कामगार विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होणार असून, मजुरांचे अधिकृत ज बाब नोंदवले जाणार आहेत.
  • मजुरांना आणणारे एजंट कोण…? त्यांना डांबून ठेवणारे सूत्रधार कोण? आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा स हभाग आहे का, याचा सखोल तपास परंडा पोलिस करत आहेत.
  • या प्रकरणातील दोषींवर प्रशासन कठोर कारवाई करणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles