
कळंब पोलिसांची मोठी कारवाई: पत्नीच्या खुनातील फरार पतीला गोठ्यातून अटक.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- पत्नीची निर्घृण ह त्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला जेरबंद कर ण्यात कळंब पोलिसांना यश आले आहे.
- गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे (रा. पुनर्वसन सावर गाव, ता.कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आ लेल्या आरोपीचे नाव त्याने सावरगाव शिवारातील एका शेतातील गोठ्यात आश्रय घेतला होता, जिथून पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

- चैन आणि दगडाने मारून केली होती हत्या
- पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ६:०० वाजण्या च्या सुमारास हासेगाव शिवार येथील सुमानधने पेट्रोल पं पाच्या समोरील शेतात ही थरारक घटना घडली होती.
- आरोपी गणेश टेकाळे याने पत्नी कोमल गणेश उर्फ विना यक टेकाळे हिच्या चारित्र्यावर संशय घेतला.
- याच वादातून त्याने कोमल यांच्या डोक्यात चैन आणि दगडाने जबर मारहाण करून त्यांना जागीच जिवे ठार मारले होते.
- याप्रकरणी मृत कोमल यांचे नातेवाईक बंडु विश्वांभर पवार (वय ५१ वर्षे, रा. करंजकल्ला, ता. कळंब) यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
- त्यानुसार आरोपीविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा र जिस्टर नंबर ४३४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- वारंवार बदलत होता ठिकाण; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अटक टाळण्यासाठी तो वेळोवेळी आपले राहते ठि काण आणि वास्तव्य बदलत होता. कळंब पोलीस त्याच्या मागावर
- . दरम्यान, आरोपी सावरगाव शिवारातील एका शेतातील गोठ्यात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
- या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला गो ठ्यातून ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने पत्नी ची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.
- या पथकाने केली कामगिरी
- सदरची धडक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीम ती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडक र व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संजय पवार यां च्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस नि रीक्षक श्री. शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. समाधान बजबळकर, पोलीस कॉन्स्टेबल अनिल भोसले (बकल नंबर १७७७), किरण माळी (बकल नंबर १८३२), औदुंबर गजबार (बकल नंबर ६९६) आणि सुनील तारळकर (बकल नंबर ९७६) यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






