
भूम-परंडा-वाशीचे आमदार, माजी आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रेरणेतून कुंभेफळ येथे मोफत साखर व जीवनावश्यक किटचे वाटप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भूम-परंडा-वाशी वि धानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार,महाराष्ट्र राज्या चे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीरा व सावंत साहेब यांच्या प्रेरणेतून कुंभेफळ येथे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- या उपक्रमांतर्गत गावातील सर्व गोरगरीब रेशन कार्डधार कांना प्रति कार्ड ५ किलो मोफत साखर आणि गरजू शेत मजुरांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
- आमदार तानाजीराव सावंत साहेब यांनी नेहमीच मतदार संघातील सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कष्टकऱ्यां च्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ दिली आहे.

- याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कुंभेफळ गावा तील गरीब व वंचित कुटुंबांना ऐन सणासुदीच्या काळात व गरजांच्या वेळी दिलासा मिळावा म्हणून या मोफत साखर आणि किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- या मदतीमुळे गावातील गोरगरीब कुटुंब आणि शेतमजुरां च्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

- या कल्याणकारी उपक्रमाचे वाटप करताना गावातील प्रमु ख पदाधिकारी व कार्यकर्ते गणेश नायकोडे, विनोद नाय कोडे आणि सचिन राऊत यांच्यासह स्थानिक कार्ड धारक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना या साहित्याचे प्रत्यक्ष वाट प करण्यात आले.

- आमदार साहेबांच्या या जनहितैषी कार्याबद्दल कुंभेफळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात येत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






