
संत मीरा पब्लिक स्कूलच्या वतीने नूतन आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा भव्य सत्कार; आमदारपदी निवड झाल्यानंतर संस्थापक डॉ. पाटील यांची शाळेला प्रथमच सदिच्छा भेट; शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील (८ जिल्हे व ७२ तालुके) विधानपरिषद निवडणुकीत आमदार म्हणून दणदणीत विजय मिळवल्या नंतर संस्थेचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटी ल यांनी परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूलला प्रथमच सदिच्छा भेट दिली.

- याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य पुष्पहार घालून यथोचित सत्कार कर ण्यात आला आणि पुढील यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

- या विशेष प्रसंगी आभार प्रदर्शनासह नागरिकांच्या भेटी गाठींच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- नूतन आमदार डॉ.पाटील यांच्या शाळेतील आगमनामुळे शिक्षक, कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

- संस्थेच्या संस्थापकांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक यशा बद्दल संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे आणि अभिमाना चे वातावरण आहे.
- त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेची शैक्षणिक व सामाजि क वाटचाल भविष्यात अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

- या सत्कार समारंभास शाळेचे मुख्याध्यापक संतोष भांड वलकर, शिक्षक संतोष शेरे, गणेश कोकाटे, सुनील चव्हा ण, सुमित कोकाटे, दादासाहेब गिरवले, प्रमोद जाधव, वा हिद मुलाणी, बालाजी गोरे, उमेश वाघमारे, यश सुरवसे, राम सुरवसे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






