
देवाचेगोठणे केरावळे व धाऊलवल्ली मारवेलवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील देवा चेगोठणे केरावळे व धाऊलवल्ली मारवेलवाडी येथील व हाळावर केरावळे व मारवेलवाडी या दोन्ही वाड्यांच्या ग्रा मस्थांनी यंदा भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई चीवर मात करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा ‘ या मोहिमेतंर्गत वनराई बंधारे बांधले.
- याकामी ग्रामपंचायत देवाचेगोठणेकडून प्लास्टिक पिश व्या व प्लास्टिक कागद उपलब्ध करुन देण्यात आले ऐन दिवाळीत ग्रामस्थांच्या जागरुकते बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

- या कामात केरावळे ग्रा.पं. सदस्य अनंत नवाळे, अविनाश नवाळे, अंजली नवाळे,केशव नवाळे, किरण नवाळे, अर्चि ता नवाळे तसेच मारवेलवाडीतील पद्माकर मेस्त्री, नितीन शिवगण, रविंद्र सौंदळकर, मंदार सौंदळकर, संतोष वाल म, संतोष मेस्त्री आदींनी सहभाग घेतला होता. भविष्यात या वहाळावर शासकीय योजनेतून सिमेंट बंधारे बांधण्या साठी प्रयत्न सुरू करण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थां नी ग्रामपंचायत देवाचेगोठणे व ग्रामपंचायत धाऊलवल्ली यांच्याकडे केली आहे.

- यापूर्वी असलेले बंधारे पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने या दोन्ही वाड्यांना भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आत्मनिर्भर होत बंधाऱ्याचे काम हाती घेतले होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






