कंडारी येथील भैरवनाथ मंदिर चोरी प्रकरणाचा तपास थंडच…..! आरोपींना अटक न झाल्यास ४ डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील कंडारी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेला एक महिना उलटूनही अद्याप आरोपींचा शोध ला गलेला नाही. पोलिसांच्या या संथ तपासाविरोधात कंडारी ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत.
  • या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून स खोल चौकशी करावी, अन्यथा येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पोलीस महा निरीक्षक (IG) कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना दिले ल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
  • काय आहे नेमके प्रकरण?
  • दिनांक ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कंडारी येथील श्री भैरवनाथ मंदिरात डल्ला मारला होता.
  • यामध्ये देवाचा मुकुट, सोन्याचे दागिने, चांदीचे हार आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला होता.
  • याप्रकरणी विलास जगन्नाथ क्षीरसागर यांच्या फिर्यादीव रून अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • ग्रामस्थांचा संताप आणि आंदोलनाचा इशारा
  • सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी सुनील भगवान खाचकड यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
  • मात्र, तपासात कोणतीही प्रगती होत नसल्याने संतापले ल्या कंडारी ग्रामस्थांनी ५ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान श्री भैरवनाथ मंदिरासमोर आमरण उपोषण केले होते.
  • ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखे कडे (LCB) वर्ग करण्यात आला. तरीही अद्याप आरोपी निष्पन्न न झाल्याने ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
  • तपासातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून चोरट्यां ना तात्काळ गजाआड करावे, अशी आग्रही मागणी कर ण्यात आली आहे.
  • प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास गावकऱ्यांसह ४ डिसें बर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे धरणे व तीव्र आंदोल न केले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles