
प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाच्या चर्चांनी धाराशिव जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- राज्याच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदा रसंघाचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
- या संभाव्य पुनरागमनाच्या वृत्तामुळे संपूर्ण धाराशिव जि ल्ह्यासह मतदारसंघातील शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

- आपल्या आक्रमक कार्यशैलीने, निर्णयक्षमतेने आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या नेतृत्वा मुळे डॉ.सावंत यांनी राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
- संकट कोणतेही असो किंवा वेळ कोणतीही असो, गरजू कुटुंबे आणि रुग्णांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
- गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांना प्राधा न्य देण्याच्या त्यांच्या या वृत्तीमुळे समर्थकांकडून त्यांना प्रेमाने ‘देवदूत’ म्हणून संबोधले जाते.
- यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अनेक ठोस पावले उचलली होती.
- प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत.
- धाराशिव जिल्हा आजही सिंचन, पाणीपुरवठा, शेती, रोज गार आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रश्नांशी झुंज देत आहे.
- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळात प्रभावी प्रतिनिधित्व असणे अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ.तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्यास जि ल्ह्यातील रखडलेली विकासकामे, सिंचन प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना मंत्रालयीन स्तरावर मोठी ताकद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- “पद मोठे असण्यापेक्षा माणसाच्या संकटात त्याच्या पाठी शी खंबीरपणे उभे राहणे अधिक महत्त्वाचे असते. डॉ. सा वंत साहेबांनी आपल्या कामातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
- त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळावी आणि धाराशिवचा आवाज मंत्रालयात बुलंद व्हावा, हीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असून आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आ हे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना महिला आघाडीच्या परंडा तालुका प्रमुख सौ. सारिकाताई मुकुंद अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






