
सावंत साहेबांना मंत्रिपद मिळालं तर अजमेर शरीफला चादर चढवणार! समीर भैया मदारी यांची जाहीर मन्नत.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा- भुम- वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत सा हेब यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे, यासाठी परंड्या तील सामाजिक कार्यकर्ते समीर भैया (मदारी) यांनी अनो खी मन्नत जाहीर केली आहे.
- साहेबांना मंत्रिपद मिळताच आपण स्वतः राजस्थान मधी ल अजमेर शरीफ येथे जाऊन हजरत ख्वाजा गरीब नवा ज रहमतुल्लाह अलैह यांच्या पवित्र दर्ग्यावर चादर अर्पण करणार आणि दर्शन घेणार, अशी ठाम घोषणा त्यांनी केली आहे.

- सावंत साहेबांच्या मंत्रिपदासाठी अजमेर दरबारात दुवा…!
- तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी मिळावी, ही आपली मनापासून इच्छा आहे.
- त्यांच्या राजकीय वाटचालीला यश मिळावे आणि त्यांना मंत्रिपदाची संधी प्राप्त व्हावी, यासाठी अजमेर शरीफ येथे जाऊन विशेष दुवा (प्रार्थना) करणार असल्याचे समीर भैया मदारी यांनी स्पष्ट केले.
- मन्नत पूर्ण करण्याचा निर्धार!
- केवळ घोषणा न करता, सावंत साहेबांना मंत्रिपद मिळा ल्यानंतर अजमेर शरीफ येथे प्रत्यक्ष जाऊन चादर चढव ण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
- श्रद्धा, सद्भावना आणि राजकीय नेतृत्वाविषयीची आपुल की व्यक्त करणाऱ्या या घोषणेची परंडा शहरात चर्चा रंगू लागली आहे.
- आता तानाजीराव सावंत साहेबांना मंत्रिपद मिळते का आ णि समीर भैया मदारी यांची अजमेर शरीफच्या दरबाराती ल मन्नत कधी पूर्ण होते, याकडे परंडा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






