
शेळगावमध्ये अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश… बसस्थानकासमोर ३६ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त; २४ वर्षीय तरुणाविरुद्ध आंबी पोलिसांत गुन्हा दाखल.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील शेळगाव येथे अवैध दारू विक्रीविरोधात आंबी पोलिसांनी धडक कारवाई करत देशी-विदेशी दारूच्या तब्बल ३६ सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत.
- बसस्थानकासमोरच अवैध विक्रीच्या उद्देशाने दारूचा सा ठा जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे.

- आकाश दत्ता मगर (वय २४, रा. शेळगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) याच्याकडून दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेळगाव बसस्थानका समोर अंदाजे २८ हजार ८०० रुपये किमतीच्या देशी-विदे शी दारूच्या ३६ सीलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
- अवैधरीत्या दारू विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा जवळ बाळगल्याचे आढळून आल्याने आंबी पोलिसांनी संबंधित दारू जप्त केली.
- याप्रकरणी आकाश मगर याच्याविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम ६५(ई) अन्वये आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- शेळगावसारख्या गावांमध्ये अवैध दारू विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक भूमिका घेण्याची गरज असून, अशा अवैध व्यवसायांवर सातत्याने कारवाई व्हावी, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






