
संगमेश्वर तालुका कुणबी समाजोन्नती संघाच्या तालुकाध्यक्षपदी अमोल लाड यांची निवड ; समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव
- प्रतिनीधी : देवरुख : प्रमोद तरळ :- संगमेश्वर तालुका कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा ग्रामीण संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी तरूण तडफदार अमोल लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
- या निवडीमुळे संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समाज बांध वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असू न विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
- संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल लाड यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

- संघटनेचे तालुकाध्यक्ष शरदचंद्र गीते यांनी राजीनामा दि ल्यानंतर देवरूख येथील कुणबी भवन येथे रविवारी संघ टनेची बैठक संपन्न झाली.
- या बैठकीत संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी अमोल लाड यांची निवड करण्यात आली.
- यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे, मुंबईचे अध्यक्ष बाळकृ ष्ण काष्टे, भाऊ कांगणे, माजी तालुकाध्यक्ष शरदचंद्र गीते, कृष्णा हरेकर, नारायण भुरवणे, दिलीप बोथले, पप्पू नाख रेकर, पप्पू गोवळकर, बंटी गोताड, नितीन लोकम, संदीप धावडे आदींसह पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आ णि आर्थिक उन्नतीसाठी विविध स्तरांवर संघटनात्मक कार्य करणे ही काळाची गरज बनली आहे.
- समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, तरुणांना शिक्षणा च्या प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रो त्साहन देणे तसेच समाजातील गरजू घटकांना सहकार्य करणे, अशा विविध उद्दिष्टांसाठी कुणबी समाजोन्नती संघ कार्यरत आहे.
- या संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अमोल लाड यांच्या वर सोपविण्यात आल्याने त्यांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य तालुक्याच्या ग्रामीण भागात अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- समाजातील विविध गावांमधील समाजबांधवांशी समन्वय साधून संघटनेची ताकद वाढविणे, समाजाच्या प्रश्नांना सं घटितपणे वाचा फोडणे आणि नव्या पिढीला समाजका र्याशी जोडणे, अशा दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग हो ईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
- या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने अमोल लाड यांचा स त्कार करण्यात आला.
- उपस्थित पदाधिकारी व समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील सामाजिक आणि संघटनात्मक कार्या साठी शुभेच्छा दिल्या.
- अमोल लाड यांच्या निवडीमुळे ग्रामीण संगमेश्वर तालुक्या त कुणबी समाजोन्नती संघाचे कार्य अधिक गतिमान हो ण्यास मदत होईल, अशी भावना समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
- समाजातील एकजूट, बंधुभाव आणि विकासाची भावना अधिक दृढ करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल लाड यांच्याकडून प्रभावी कार्य घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






