हसोळ येथील मेजारीवाडी शिव मंडळातर्फे महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे हसोळ येथील मेजारीवाडी शिव मंदिरामध्ये प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही रविवार दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
  • रविवार दि १५ व सोमवार १६ या दोन दिवसांत आयोजि त केलेल्या कार्यक्रमात दि. १५ रोजी स.७ ते ९ या वेळेत शिवलीलामृत अध्याय वाचन, स.१० ते २ पुजा व लघुरुद्र (अभिषेक), सायं ४ ते ६.३० दिंडी प्रदक्षिणा, रात्री ७.३० ते ८.३० हरिपाठ, रात्री ९ वा. बुवा सौ योगिता परब पवार (श्री देव केसरकर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ वर्दे कुडाळ) विरुद्ध बुवा सौ.स्वराली नाटेकर (श्री भेराई देवी प्रासादिक महिला भजन मंडळ,मोंड गावठाण वाडी ता. देवगड) यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना आ योजित करण्यात आला आहे.
  • दि. १६ रोजी स. ९ ते ११ पूजा व आरती, दु. १२.३० ते २ महाप्रसाद, सायं ४ ते ६ या वेळेत हळदीकुंकू समारंभ, ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत जि.प.पू. प्रा. केंद्रशाळा केळ वली नं ३ व जि.प.पू. प्रा. शाळा मोरोशी नं १ या शाळांम धील मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम होणार आहेत.
  • परिसरातील तसेच तालुक्यातील भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मेजारीवाडी शिव मंडळ,हसोळ यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles