मराठी भाषिकांच्या एकजुटीच्या लढ्याला यश – मिरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली.

  • प्रतिनिधी : अनंत पाटील :- मराठी अस्मितेसाठी लढणा ऱ्या नागरिकांच्या ऐक्याचा मोठा विजय! मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरो धात उभारलेल्या ऐतिहासिक मोर्च्यानंतर अखेर शासना ला कारवाई करावी लागली आहे.
  • मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियु क्ती करण्यात आली आहे.
  • हा निर्णय म्हणजे मराठी भाषिकांच्या भावना,अस्मिता आ णि लोकशक्तीची जाणीव शासनाला करून दिल्याचा ठोस पुरावा आहे.
  • मंगळवारी बंदी आदेश असतानाही हजारो मराठी बांधवां नी रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
  • सरकारने कलम १४४ लावून मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न के ला, अनेक कार्यकर्त्यांना अटक केली, मात्र मराठी जनतेने न घाबरता मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
  • हिंदी भाषिक व्यापाऱ्याच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्च्या ला प्रशासनाने मूक पाठिंबा दिला, परंतु मराठी भाषिकां चा मोर्चा थोपवण्यासाठी दडपशाही वापरली गेली.
  • हे संपूर्ण प्रकरण विधीमंडळात गाजले आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यावर दबाव वाढला. परिणामी, ही महत्वाची प्रशासनिक बदलाची कारवाई करण्यात आली.
  • हे केवळ एक बदली आदेश नसून, मराठी अस्मितेचा विज य आहे. हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र येणे हेच काळाची गरज आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles