
अहेरीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश.
- प्रतिनीधी : स्वरूप गावडे :-अहेरी नगरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांच्यासह आयुष मामीडवार, विनेश तोटावार, साईनाथ औतकर, ओम मुरमुरवार, राजू किसरवार व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जा हीर प्रवेश केला.
- गडचिरोली येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळा व्यात उद्योग व कामगार मंत्री उदय सामंत, जिल्हा सहपा लकमंत्री आशिष जयस्वाल, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडवा आणि विधान परिषद आमदार मनीषा ताई कायंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

- जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधा नसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या नेतृत्वात या सर्व कार्य कर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- सचिन येरोजवार हे अहेरी शहरातील विविध सामाजिक प्रश्न तसेच नागरिकांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोड ण्यासाठी सक्रिय राहिले आहेत.
- त्यांच्या प्रवेशामुळे अहेरी शहरात शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढणा र असल्याची चर्चा नागरिकां मध्ये सुरू आहे.
- दरम्यान, येत्या काही दिवसांत अहेरी नगरातील आणखी काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा टप्प्याटप्प्याने शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत यांनी दिली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






