अकोला बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियान संपन्न.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :- अकोला बाजार व अकोला बाजार मंडळातील येणार्‍या सर्व गावांतील नागरिकांना शासनाच्या सर्व योजना एकाच छताखाली मिळाव्यात म्ह णुन महसूल विभागा मार्फत येथील ईश्वर देशमुख सभागृ हात महसुल सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ४ ऑगस्ट रोजी आयोजित केले.
  • या शिबिरात नागरिकांना फार्मर आयडी, पीक विमा,नमो किसान योजना,अग्रीस्टक, पिएम किसान योजना, आधार अपडेटशन, आरोग्य विभागा कडून नागरिकांची आरोग्य तपासणी,कृषी विभागाकडून फळबाग लागवड व पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजना व अनुषांगकीक इतर यो जना इत्यादीचे समस्याचे निवारण करून या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.
  • या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन नायब तहसीलदा र रुपाली बेहरे होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रा. पं.सरपंच योगेश राजूरकर,प्रमुख पाहुणे उपसरपंच प्रविण मोगरे,मंडळ अधिकारी प्रीतम गोडे होते.
  • तर ग्राम महसुल अधिकारी आकाश जगताप,स्वाती गज भिये, सुरभी शर्मा,कृषी सहायक कुरसंगे, पोलिस पाटील रंजीत गौरकार, अमोल राठोड, राजेश काटपेलवार, पत्रका र हमीद पठाण, सचिन कोयरे, प्रविण राठोड यांची उपस्थि ती होती.
  • कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसुल विभागा मार्फत वृक्ष रो पण करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी प्रीत म गोडे यांनी केले, संचालन ग्रा.म.अधिकारी भावना लोखं डे, तर आभार ग्रा.म. अधिकारी सविता देशमुख यांनी मानले.
  • या कार्यक्रमासाठी ग्राम महसूल सेवक बाबाराव देवकते, संतोष नेवारे, नितीन निखाडे, वसंत येरके, त्र्यंबक देवकते, योगिता येगडवार, अंगणवाडी सेविका, अशाही सेविकांनी आरोग्य कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles