परंडा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागांचे पंचनामे सुरू; कुंभेफळसह विविध गावांत प्रशासनाकडून पाहणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यात यं दा जाणवणाऱ्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेती पिकां सह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
  • या पार्श्वभूमीवर, तालुक्याचे तहसीलदार यांच्या आदेशानु सार प्रशासनाने युद्धपातळीवर फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
  • तालुक्यातील कुंभेफळ सह अनेक गावांमध्ये सध्या हे पंचनामे सुरू असून यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
  • यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे परंडा तालुक्यातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. याचा थेट फटका फ ळबागांना बसला असून ऊस, डाळिंब, पेरू, सीताफळ, बो र, लिंबू, चिकू आणि केळी यांसारख्या महत्त्वाच्या फळबा गा पाण्यासाठी सुकू लागल्या आहेत.
  • अनेक ठिकाणी फळबागा जळून खाक होण्याच्या मार्गा वर असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
  • शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची दखल घेत महसूल व कृषी विभागाला तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे आ देश देण्यात आले आहेत.
  • तहसीलदारांच्या आदेशानुसार गाव पातळीवर ग्राम महसू ल अधिकारी वाघमारे(तलाठी), ग्रामसेवक आणि कृषी स हाय्यक यांचे पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे.
  • हे पथक प्रत्यक्ष फळबागांची पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तयार करत आहेत. पारदर्शकता राहावी आणि अचूक माहिती संकलित व्हावी,यासाठी पंचनामे क रताना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतातील नुकसानीचे आणि फळबागांचे फोटोही काढले जात आहेत.
  • दुष्काळाच्या या भीषण संकटात प्रशासनाकडून सुरू अस लेल्या या तत्परतेबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
  • मात्र, फळबागा जगवण्यासाठी मोठा खर्च झालेला अस ल्याने, प्रशासनाने हे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासना कडे अहवाल पाठवावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लव कर आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
  • अशी मागणी कुंभेफळ येथील शेतकरी विट्टल तिपाले आ णि परंडा तालूक्यातिल परिसरातील समस्त शेतकरी वर्गा कडून केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles