महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :-महत्मा गांधी विद्याल य परंडा येथे लोकमान्य येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळ क याची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आहे .
  • कार्यक्रमावेळी प्रशालेतील जवळपास वीस विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.
  • याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आमच्या प्रशालेतील एम टी एस ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तिन्ही विद्यार्थ्याचे व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
  • एम.टी.एस मध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
  • 1) मदने प्राची आप्पा-122 गुण घेऊन तालुक्यातून प्रथम आलेली आहे.
  • 2) कु. तनुजा अरुण पाडुळे-104 गुण घेऊन प्रशाले मधून दुसरी आलेली आहे.
  • 3) कुमारी सई हरिश्चंद्र बोंबलट-88 गुण घेऊन प्रशाले मधून तिसरी आलेली आहे.
  • तसेच अण्णाभाऊ साठे जयंती कमिटी परंडा शहर यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अण्णाभाऊ सा ठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषणे केली त्यामध्ये,
  • 1) कु. दबडे सृष्टी नागनाथ हिचा प्रथम क्रमांक आला असून तिला तीन हजार रुपयांचे पारितोषिक मिळालेले आहे.
  • 2) पाटील अर्जुन विजयकुमार हा विद्यार्थी तृतीय आला आहे.
  • या दोन्ही विद्यार्थ्यांचा पण पालकांसोबत सत्कार करण्यात आला.
  • कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रणजीत घाडगे होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पाडुळे,आप्पा मदने, विजयकुमार पाटील,लक्ष्मण गुडे, सौ. सुरेखा बोंबलट हे होते.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण ठाणांबिर यांनी केले व समारोप गोरख मिसाळ यांनी केले.
  • कार्यक्रमावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे,पर्य वेक्षक बाळासाहेब काशीद ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्म चारी ,बहुसंख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles