
किष्टापूर फाटा ते खमनचेरु टर्निंग रस्त्याची दुरुस्ती करा; शिवसेना (शिंदे गट) यांची बांधकाम विभागाकडे मागणी.
- प्रतिनीधी : अहेरी : स्वरूप गावडे :- किष्टापूर फाटा ते खमनचेरु टर्निंग पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि पुलाची खराब झालेली अवस्था यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण करावे, तसेच सं बंधित पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, अहेरी येथील उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

- या मार्गावरून दररोज नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र , रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचाल कांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अप घाताचा धोका अधिक वाढला आहे. तसेच पुलाची दुरव स्था झाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- या पार्श्वभूमीवर युवासेना,अहेरी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन येरोजवार यांच्या मार्गदर्शना खाली आणि शिवसेना अहेरी शहर संघटक आयुष सुनील मामीडवार यांच्या नेतृ त्वाखाली संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले.
- नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संबंधित मार्गाची पाहणी करावी आणि रस्ता दुरुस्ती, डांबरीकरण तसेच पु लाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
- यावेळी अहेरी शहर प्रमुख विनेश तोटावार,अमित संगूवार श्रीनिवास सिडाम, करण सिडाम आदी उपस्थित होते.
- संबंधित विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिवसै निकांनी व्यक्त केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






