स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही सालेगाव पाण्यासाठी तहानलेले; ‘भीम पॅंथर’ संघटनेचे आजपासून आमरण उपोषण सुरू.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- देशाला स्वातंत्र्य मि ळून ७९ वर्षे पूर्ण होत आली तरी मानवाच्या मूलभूत ह क्कांची पायमल्ली थांबलेली नाही.
  • संपूर्ण चार महिन्यांचा उन्हाळा उलटून गेला आणि आता पावसाळ्याचे शेवटचे दोन महिने शिल्लक राहिले आहेत, तरीही सालेगावनगरीला पाण्यासाठी वणवण भटकावे ला गत आहे.
  • प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करत, सालेगावच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपासून (दि. ३ ऑगस्ट २०२६) ‘भीम पॅंथर सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने गावात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
  • यापूर्वी गावकऱ्यांच्या वतीने १६जुलै आणि २९ जुलै रोजी प्रशासनाला कागदोपत्री निवेदने देण्यात आली होती.
  • आज ३ ऑगस्ट रोजी तिसरे निवेदन देऊन शेवटचा मार्ग म्हणून हे उपोषण पुकारण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४५ अनु सूची (१) आणि भारतीय संविधानाचे कलम २१ हे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा आणि पाण्याचा मूलभू त अधिकार देतात.
  • मात्र, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सालेगाव या अधिकारां पासून वंचित राहिले असून गाव मागासलेपणाचा दंश झे लत आहे.
  • “लोकप्रतिनिधी काम करत नसतील तर त्यांना पायउतार करा”उपोषणस्थळी बोलताना भीम पॅंथर संघटनेचे पदा धिकारी म्हणाले की, “अनेक गावांमध्ये पाण्याचा स्त्रोत भरपूर असून तेथे विकासाची गंगा वाहत आहे.
  • सालेगावलाही तसाच बनवण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि नागरिकांनी संघर्ष करणे गरजेचे आहे.
  • आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर पाणी देऊ शक त नसतील, तर त्यांना पदावरून पायउतार करण्यासाठी जनतेने आता लढा उभारला पाहिजे.
  • “यांनी सुरू केले उपोषण:भीम पॅंथर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.डॉ.प्रतिक बबनराव सूर्यवंशी आणि उपाध्यक्ष संघर्ष राजेंद्र भालेराव यांनी या उपोषणा ची सुरुवात केली आहे.
  • ग्रामस्थांची मोठी उपस्थिती:या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सालेगावला पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपो षणस्थळी उपस्थित होते.
  • यामध्ये तानाजी (भाऊ) पाटील, रत्नदीप बाडूरे, कुलदीप बाडूरे, आकाश (भाऊ) घोडके, जोती महादेव गोरे, सखूबा ई कमलाकर देशपांडे, महादेवी विठ्ठल लोंढे, बेबाबाई दया नंद चंडके, महानंदा नेताजी घोडके, आशा गोविंद गुरव, आनिता बालाजी धनेराव, लक्षा बाई हनुमंत भालेराव, जो ती व्यंकट गुरव, अर्चना भगवान गुरव, सुसाबाई नागनाथ घोडके, सुगला संजू घोडके, लता दत्तात्रय शिंदे, विमल शं कर भालेराव, आकाश कमलाकर घोडके, सचिन दयानंद चंडके, विकास संजय घोडके, पवन दिलिप चंडके, विका स तुकाराम सुरवसे, बबन सुधाकर वाघमारे, तानाजी याद व भालेराव, अमोल सुमित भालेराव, विकास प्रशांत कांब ळे, तुकाराम भीमसेन माने, राजेंद्र लक्ष्मण भालेराव यांच्या सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
  • जोपर्यंत सालेगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
  • या आंदोलनामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles