
कुणबी शाखा तालुका लांजातर्फे जाकडी सामन्यात लांजातील दोन शाहीर दि. १८ सप्टें रोजी दादर येथे आमनेसामने.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका लांजा यांच्या वतीने दि.१८ सप्टें बर २०२५ रोजी रात्री ७.३० वाजता छत्रपती शिवाजी म हाराज नाट्यमंदिर दादर येथे शक्तीवाले शाहीर संजय जो शी विरुद्ध तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन या दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी शाहीरांमध्ये महा – मुकाबला रंगणार आहे.

- शाहीर संजय जोशी यांचा सुमधुर आवाज व देवेंद्र झिमन यांची सुरेल शाहीरी रसिक राजाचे मन बेधुंद करणार आहे.
- हे दोन्ही शाहीर लांजा तालुक्यातील असून पारंपरिक क लेचा वारसा पुढे नेणाऱ्या या अद्वितीय कलगी-तुरा साम न्याला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कोकणच्या या कलेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











