
राष्ट्रसंत प.पू.पाचलेगांवकर महाराज यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- राष्ट्रसंत प.पू. पाचले गांवकर महाराज यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त विशेष अं काचे प्रकाशन रविवार, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी,चंचल स्मृती, दादर, मुंबई येथे महाराजां च्या नामजयघोषात, भक्तीभावपुर्ण वातावरणात संपन्न झाले.

- यावेळी व्यासपिठावर मा. सद्गुरु दत्तानंद स्वामी- माहुलगां व, सन्मा.अनिल वेदव्यास गलगली सामाजिक कार्यकर्ते, मा.श्रीकांत (बाळा) सावंत – कार्यवाह राष्ट्रसंत पाचलेगांव कर महाराज सेवा समिती, मा.जयप्रकाश ठाकुर व मा. वि ठ्ठल परब – विश्वस्त मुक्तेश्वर आश्रम मुलूंड, मा.सुनिल देव रुखकर आणि महाराजांचे परमशिष्य, भक्तगण, हितचिंत क छोटेखानी झालेल्या सोहळ्यास उपस्थित होते.
- सर्वप्रथम राष्ट्रसंत प. पू. पाचलेगांवकर महाराज यांच्या प्र तिमेस पुष्पहार अर्पण करुन मनोभावे महाराजांची आरती करण्यात आली.
- यानंतर श्रीकांत (बाळा) सावंत यांनी प्रास्ताविक करतांना निक्षून सांगितले की हे राष्ट्र कार्य महाराज आपणाकडून करवून घेत आहेत.
- राष्ट्रसंत प. पू. पाचलेगांवकर महाराज यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त महाजांचे अतिशय मनमोहक छायाचित्र असलेल्या विशेष अंकाचे शानदार प्रकाशन महाराजांच्या जयजयकाराने करण्यात आले.
- सन्मा.अनिल वेदव्यास गलगली समाजसेवक यांनी महारा जांच्या राष्ट्र कार्याचा गौरव केला.तर मा.सद्गुरु दत्तानंद स्वा मी- माहुलगांव यांनी उपस्थितांना आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध केले.
- अवधुत सारंग – विश्वस्त मुक्तेश्वर आश्रम मुलूंड यांनी महा राजांचे विविध अनुभव कथन केले.

- या विशेष सोहळ्याला प्रकट महाराष्ट्र साप्ताहिकाचे संपाद क मा.दत्ताराम दळवी व युट्यूब वृत्तवाहिनीचे संपादक र वी कोतापकर, सहकारी दिनेश हुमणे उपस्थित होते.
- सद्गुरु दत्तानंद स्वामी व अनिल वेदव्यास गलगली यांची प्र कट मुलाखत घेतली. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांग ता झाली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









