आलापल्ली क्रीडा संकुलाचा बोजवारा लाखोंचे साहित्य वापराअभावी बंद खोलीत कैद, क्रीडाप्रेमींच्या असंतोषाचा उद्रेक; कोट्यवधींचा क्रीडासंकुल, पण खेळाडू मात्र अडचणीत.

  • प्रतिनिधी : आलापल्ली : स्वरूप गावडे :-अहेरी उपवि भागातील प्रमुख शहर असलेल्या आलापल्लीमध्ये पाचही तालुक्यांतील युवक युवती स्पर्धा परीक्षा,पोलीस भरती त सेच विविध खेळांसाठी मोठ्या संख्येने येत असतात.
  • शहराच्या मध्यभागी असलेले भव्य क्रीडा संकुल हे सर्वां साठी महत्वपूर्ण केंद्र मानले जात असले तरी,गेल्या काही महिन्यांपासून हे संकुल अकार्यक्षम स्थितीत आहे.
  • संकुलातील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी सराव करणाऱ्या खेळाडूंना मोठ्या अडचणीं चा सामना करावा लागत आहे.
  • विशेषत: हिवाळ्यात लवकर अंधार पडत असल्याने अने कांना सराव अर्धवट सोडून परत जावे लागते.
  • मैदानावर येणाऱ्या विद्यार्थी,पालक,महिला व कर्मचारी वर्गासाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्थित सोय नाही.
  • नळ तुटलेल्या अवस्थेत असल्याने पाण्यासाठी खेळाडूंना बाहेर अवलंबून राहावे लागते. क्रीडा संकुलातील ओपन जिमचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत पडून असून त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
  • शासनाकडून जवळपास एक वर्षापूर्वी दिलेले आधुनिक जिम साहित्य आजपर्यंत वापरात आलेले नाही.ते साहित्य बंद खोलीत धुळखात पडून आहे,ही खेळाडूंसाठी अत्यंत निराशाजनक बाब आहे.
  • संकुलातील इंडोर बॅडमिंटन कोर्टावर मुली आणि महिला खेळाडू मोठ्या प्रमाणात येतात. अनेकदा उशिरापर्यंत त्यां चा सराव सुरू असतो.
  • त्याच वेळेस बाहेरील मैदानात काही युवक दारू पिताना दिसतात,ज्यामुळे महिला खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • सुरक्षा रक्षक नसल्यामुळे भविष्यात कुठलीही दुर्दैवी घट ना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संकुलाची एकंदरीत परिस्थिती पाहता प्रशासनाची निष्काळजी भूमिका स्पष्टपणे जाणवते.
  • क्रीडा संकुलातील समस्या अधिकच गंभीर झाल्यामुळे क्रीडा प्रेमींनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना निवेदन सादर केले आहे.
  • संकुलातील कायमस्वरूपी तालुका क्रीडा अधिकारी, प्रशि क्षक आणि सुरक्षा रक्षकांची तात्काळ नेमणूक करावी,स्ट्री ट लाईट सुरू करावेत, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या वे आणि जिम साहित्य तातडीने वापरात आणावे, अशा प्र मुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
  • निवेदन देताना क्रीडाप्रेमी अमित येणप्रेड्डीवार,साई तुलसी गिरी,श्रीकांत जल्लेवार,शिवम नामेवार,अनिश सानप,अंशु ल जल्लेवार,प्रज्योत उईके,श्रीनिवास गच्छर्लावार, सागर नांदूरकर आणि प्रतीक नामनवर उपस्थित होते.
  • आलापल्ली क्रीडा संकुलाकडून परिसरातील युवकांना मो ठ्या अपेक्षा आहेत. परंतु आज संकुलातील वाढत्या सम स्यांमुळे त्यांची स्वप्ने आणि तयारी दोन्हीही अडचणीत येत आहेत.
  • तात्काळ उपाययोजना न झाल्यास क्रीडा क्षेत्रातील प्रति भावंत खेळाडूंना मोठे नुकसान सोसावे लागू शकते,अशी भीती व्यक्त केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles