
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर “स्वर्गाहूनीही सुंदर… माझं कोकण…!” हे सुरेल गीत प्रदर्शित.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- वळणवाटांनी सजले लं, फेसाळ लाटा अंगावर झेलणारं, शेती-बागांच्या कुशीत वसलेलं, आंबा-फणसाच्या गंधात न्हालेलं, अगदी तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या मनातलं कोकण आता एका मधुर गीतातून आपल्यासमोर येत आहे.
- “स्वर्गाहूनीही सुंदर माझे कोकण बहरलेले” हे गीत नव्हे तर कोकणाचा आत्मा आहे…!

- गीतकार निलेश उजाळ यांचे प्रभावी शब्द, गायक प्रफुल्ल पुजारी यांचे रसभरित स्वर आणि संगीतकार ज्ञानदीप का सले यांची अफलातून गीत बांधणी या गाण्याला हमखास यश देईल…! या गाण्यात कोकणच्या रानमेव्याची मोहक गुंफण केली गेली आहे.
- तसेच हिरवं शिवार, मोत्यासारखी माणसं, मंदिरांच्या घंटा नादातुन गुंजणारी भक्ती, सतत आपल्याच मस्तीत गुणगु णणाऱ्या सागरी लाटा आणि सुगंध होऊन वाऱ्यात मिस ळलेल्या कोकणातील आठवणी आपणास अनुभवायला मिळणार आहेत.
- यातील प्रत्येक ओळ कोकणातील लाल मातीच्या सुगंधाने दरवळणारी आहे, प्रत्येक सुर तुमच्या मनाला थेट गावाक डं घेऊन जाईल असा आहे.
- “स्वर्गाहूनीही सुंदर माझे कोकण बहरलेले” – हे गीत लव करच ‘आम्ही कोकणी कलाकार’ या YouTube चॅनेलवर प्रकाशित होणार आहे. हे गाणं एकदा ऐकलंत की तुमच्या ही मनात कोकण पुन्हा पुन्हा फुलून येईल!हे निश्चित
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











