दिल्लीत झालेल्या कारबॉम्ब स्फोटाचा अकोला बाजार येथे जाहीर निषेध; येथील नवसंकल्प प्रतिष्ठान च्या वतीने स्फोटात मृत्यू झालेल्या बांधवाना वाहिली श्रध्दांजली.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे :-सोमवार संध्याकाळी राजधा नी दिल्लीच्या लालकिल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका चालत्या कार मध्ये स्फोट झाला.
  • या कारबॉम्ब स्फोटाने संपूर्ण देश हादरला. या स्फोटात दो न महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपा स तीसच्या वर जखमी झाले.
  • या भ्याड स्फोटाचा अकोला बाजार येथे पडसाद उमटत येथील नवसंकल्प बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती चौक(बस स्टँड चौक)येथे तरुणांनी एकत्र येत या स्फोटात मृत्यू झालेल्या सर्व बांधवांच्या आत्म्याला शांती लाभो.
  • तसेच या स्फोट घडवून आणार्‍यांच्या विरोधात जाहीर नि षेध करत भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमात दोन मिनिटे मौन धारण करून भाव पूर्ण श्रद्धांजली वाहिली तर जखमी झालेल्या बांधवांची प्रकृती लवकरात लवकर बरी यावी यासाठी प्रार्थना केली.
  • हा स्फोट घातपातच्या रूपाने घडवून आणला असून अजून याच्या मागे परकीय शक्तीचा हात आहे की कोण्या समाजकंटकाचा हात आहे.
  • याचा सरकारने जलदगतीने तपास करून यात सहभागी असणाऱ्यांचा ताबडतोब शोध घेऊन कडक शिक्षा करावी, भविष्यात जेणे करून अश्याप्रकारचा भ्याड हल्ला कर ण्यास कोणी धजावणार नाही,आपल देश हा शांतता प्रिय देश असून जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल, देशामधील नागरिकांच्या शांततेचा अंत पाहणार त्याला धडा शिकविल्या शिवाय आपला देश शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया नवसंकल्प प्रतिष्ठान व नागरिकांनी व्यक्त केली.
  • यावेळी सचिन कोयरे, वैभव जाचक,राम कोटरंगे, श्रावण वाघाडे,दिनेश बाकरेवाल,कांचन भवरे,मनोज चौधरी, शंक र कोटरंगे, लकी ठाकरे,आकाश जैस्वाल, शंकर परचाके, महेश कुणाल कराळे, सतीश देवतळे,सूरज मादेश्वर, सम्य क घुले,शेख अल्ताफ,गोलु कोयरे,शेख शाहरुख, योगेश घनकर,रमण टेकाम,रामभाऊ वाघाडे,अक्षय रंगारी, जयदी प नन्नवरे,प्रविण राठोड,शेख जुबेर, अनिल नेवारे, राहुल मूर्खे, सुजित टिपले,शेख आसिफ आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles