
मुर्शी वाणीवाडी येथील ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत संगमेश्वर, साखरपा येथील देवडे गावातील “देवडे बॉईज” संघ विजयी.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील श्री गोपाळकृष्ण युवा मित्रमंडळ मुर्शी,वाणीवाडी येथे घेण्यात आलेल्या ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत देवडे बॉईज सं घ विजेता व गांगेश्वर कनकाडी संघ उपविजेता ठरला.
- तसेच राहुल 11 संघाला तृतीय पारितोषिकावर समाधान मानावे लागले.

- उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज या दोन्ही वैयक्तिक बक्षीसां चा किताब देवडे बॉईज संघाच्या अमोल कांगणे या फलं दाजाने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर जिंकला.
- दुसऱ्या सेमिफायनल सामन्यात त्याने गेल्यावर्षीपासुन अ पराजित असणाऱ्या व स्पर्धेतील सर्वात बलाढ्य समज ल्या जाणाऱ्या राहुल इलेव्हन संघाला एकहाती नमवले.
- 55 धावांचा पाठलाग करताना त्याने चौकार, षटकारांच्या जोरावर वैयक्तिक 45 धावा केल्या व 4 चेंडु राखुन सहज विजय मिळवला.
- या स्पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर होता. अंतिम साम न्यातही त्याने जबरदस्त कामगिरी केली. त्याला आकर्षक चषक, मंडळाचे टी शर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्या त आले.
- या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 15000, द्वितीय पारितो षिक 10000, तृतीय पारितोषिक 5000 व तिन्ही विजे त्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
- या स्पर्धेत सचिन निवळकर, चिन्मय भिंगार्डे, प्रमोद मोघे, निलेश मोघे, श्रेयश शेट्ये व सुरज शेट्ये यांनी पंच म्हणून काम पाहिले.
- स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाडीतील सर्व ग्रामस्थ व कमि टीच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











