इस्क्रा फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

  • प्रतिनिधी : हिराजी देसले :- इस्क्रा फाऊंडेशन ही संस्था शिक्षण,आरोग्य,महिला सबलीकरण,पर्यावरण संवर्धन आ णि समाजविकास या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून समाजाती ल सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या सर्वांगीण विकासा साठी तसेच ज्ञानवृद्धीसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र दे सले यांनी दिली.
  • २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने ठा णे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये असलेल्या कोठारे गावात दोन दिवस आधीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
  • गावातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीच्या वि द्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्या त आले.
  • या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्या र्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार चित्रे काढली तसेच निबंध लिहिले.
  • विशेष म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांना निबंध लेखन अवघ ड असतानाही त्यांनी प्रयत्नपूर्वक लेखन केले. स्पर्धेत सह भागी झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. त्यांनी घरी जाऊन या उपक्रमांची माहि ती आपल्या पालकांनाही दिली.
  • यासोबतच गावात वारकरी संप्रदायाचा मानवतेचा संदेश देणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या विषयावर अस लेल्या “तुकाराम”सिनेमाचे प्रोजेक्टर वर गावात दाखवण्या त आला.
  • यामध्ये गावकरी आणि विद्यार्थी उत्साहाने सामील झाले. या चित्रपटामध्ये संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य व त्यांचा आध्यात्मिक प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
  • विद्यार्थ्यांनी हा चित्रपट अतिशय आनंदाने पाहिला, असे मत संस्थेच्या डायरेक्टर-चेतन कांबळे यांनी व्यक्त केले.
  • 25 जानेवारी रोजी शहापूर मधील काही मान्यवरांची भेट घेऊन विविध उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आणि उपक्रमांसाठी आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत गोळा कर ण्यात आली.
  • सदर उपक्रम हा पूर्णपणे लोकवर्गणीतून उभा केला गेला असे मत सचिव प्रगती कांबळे यांनी व्यक्त केले. प्रजासत्ता क दिनाच्या दिवशी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली.
  • या प्रभातफेरीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर ध्वजवंदन कार्य क्रम पार पडला.
  • यावेळी नितीन पाटील सर यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकां चे तसेच इस्क्रा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत के ले विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.
  • सर्व विद्यार्थ्यांनी मेहनतीने तयारी करून आत्मविश्वासाने भाषणे सादर केली. शाळेचे शिक्षक उत्तम घरत सर व नि तीन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचा नियमित सराव करून उत्कृष्ट तयारी करून घेतली असेल याचा प्रत्येय सर्वांना कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागावरून जाणवला.
  • तसेच विद्यार्थ्यांच्या एका गटाने संगीत व नृत्य सादर करू न उपस्थितांची मने जिंकली, अशी माहिती प्रोजेक्ट कोऑ र्डिनेटर श्वेता पाटील ह्यांनी व्यक्त केले.
  • संस्थेचे सदस्य मयूर ठोके यांनी आपल्या मनोगतात विद्या‌ र्थ्यांबरोबर, ग्रामस्थांबरोबर तसेच शिक्षकांबरोबर आलेले अनुभव सांगितले.
  • कार्यक्रम प्रमुख अक्षय लखांबरे यांनी गावकरी व शिक्षकां नी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.संस्थेच्या सदस्य अर्पिता पिळणकर यांनीही आपले अनुभव व्यक्त केले. अशी माहितीसंस्थेचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर व कार्य क्रम प्रमुख अक्षय लखांबरे यांनी दिली.
  • उपक्रमासाठी तालुक्यातील दानशूर व्यक्तींपैकी सिद्धेश दादा व हरेश पष्टे दादा यांनी स्टेशनरी साहित्य तसेच प्रमाणपत्र छपाईसाठी सहकार्य केले.
  • दीपक दादा आणि शहापूर येथील पत्रकार अंकुश भोईर यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी सहकार्य केले.
  • या उपक्रमामध्ये अर्पिता पिळणकर, मयूर ठोके, अजित स र, योगेश देसले,भूषण देसले आणि सर्व पदाधिकारी प्रत्य क्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी झाले, अशी माहिती संस्थेच्या संस्थेच्या सदस्य अर्पिता पिळणकर ह्यांनी सांगितली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles