तिवरे,कोंडतिवरे विकास मंडळातर्फे जि.प.मराठी शाळा कोंडतिवरे येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथ‌ मिक मराठी शाळा कोंडतिवरे शाळेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी अंगणवाडी ते हा यस्कूल व कॉलेज पर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण ७४ विद्या र्थ्यांना वह्या, दप्तरे, रेनकोट, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वाटप त्याचबरोबर अल्पोपहार,चहा बिस्किटे वाटप करण्यात आले.
  • ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हा तभार मिळावा, तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हे वाटप करण्यात आले.
  • या उपक्रमाला श्री दत्ता खंदारे अध्यक्ष सुनिर्मल फाऊंडेश न (धारावी) यांच्या वतीने वह्या, युवक मंडळ शिरवलीतर्फे श्री.विजय कुळये यांच्या तर्फे दप्तरे, सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट यांच्या वतीने रेनकोट, वह्या व गरजू होतक रू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, श्री विकास धनावडे अध्यक्ष झेप प्रतिष्ठान तर्फे वह्या तसेच प्रकाश वडये यांच्या कडून पेन्सिल, पट्टी कटर रबर पॅक, श्री प्रदिप राणे, सहदेव बाव कर यांच्याकडून बिस्किटे व चहा वाटप आणि श्री विजय सहदेव तरळ यांच्यातर्फे नाश्ता वाटप करण्यात आले.
  • सदर कार्यक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक श्री कुळये सर यां नी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
  • यावेळी राष्ट्रीय स्तरावर तिवरे गावचे नाव करणाऱ्या प्रसि द्ध धावपट्टू मार्शल विजय सहदेव तरळ,सामाजिक कार्यक र्ते श्री दिपक पाटील, ओणी विभाग संपर्क प्रमुख मुंबई श्री मंदार राजये, ओझर ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि शिवसेना शाखाप्रमुख श्री.अनंत (आमरेश) तरळ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ताराम बाणे, उपाध्य क्ष संजय सूद, खजिनदार सचिन सूद, दिलिप सूद, रमेश मांडवकर, अनिल तरळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.दिपा तरळ , अंगणवाडी सेविका दिया दिलिप तरळ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला मदत दरवर्षी प्रमाणे श्री प्रमोद तरळ यांच्या माध्यमातून मिळाली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles