
कळसवली तळेकर वाडी येथे भव्य श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे कळसवली तळेकर वाडी येथील राधाकृष्ण सेवा मंडळ यां च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शुक्रवार दि १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्स व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

- या उत्सवाच्या निमित्ताने राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध श क्तीवाले शाहीर गायिका ऐश्वर्या प्रशांत गोतावडे श्री महाल क्ष्मी फुगडी मंडळ गोतावडे वाडी. मु. ओणी (कोंडिवळे) गोतावडे वाडी विरुद्ध तुरेवाले शाहीर गायिका सौ.सुनीता सु. गोंडाळ/मीनाक्षी म. राऊत.श्री नवलादेवी टिपरी नृत्य कला पथक ताडदेव घराणे, वस्ताद कै. खेमाजी- तानाजी गोंडाळ यांचे शिष्य.मु.शीळ (गोंडाळ वाडी)या दोन महिला शाहिरांमध्ये शक्ती – तुरा टिपरी नृत्याचा जंगी सामना रंगणार आहे.
- सदर उत्सवास सहकुटुंब सहपरिवार सहभागी होऊन का र्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन राधाकृष्ण मंडळ तळेकर वाडी यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











