
फुपेरे भोवडवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भव्य महाशिवरात्री उत्सव.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे फुपेरे भोवडवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये रविवार दि.१५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री उत्सवानिमि त्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- रविवारी सकाळी ८ वा. पूजाविधी,स. १० वाजल्यापासून आरती व तीर्थप्रसाद, दुपारी २ वा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायं ४ वा.युवा नेत्या कु.अपुर्वाताई सामंत यां च्या शुभ हस्ते हस्ते रंगमंचचे उद्घाटन होणार आहे.

- सायं ४ ते ७ वाजेपर्यंत महालक्ष्मी ढोल पथक आडवली पु जारवाडी यांच्या ढोल वादनाचा कार्यक्रम होईल सायं ७ ते ९ हरिपाठ – वारकरी संप्रदाय शीळ, रात्री १० वा. कोकणा तील कला- संस्कृती,जाखडी,नमन, भजन आदी लोकक लांचे एकत्रित धुमशान म्हणजेच “कोकणचा साज, संगमे श्वरी बाज” हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
- या धार्मिक सोहळ्याला भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती भोवडवाडी विकास मंडळ (फुपेरे) यांच्या वतीने अध्यक्ष श्री.मनोहर श्री.भोवड, उपाध्यक्ष अनाजी तु.भोवड, सचिव रविंद्र सि.भोवड, उपसचिव समिर तु.भोवड, खजिनदार चंद्रकांत श्री भोवड,उपखजिनदार मंगेश पां भोवड तसेच ग्रामस्थ सिताराम अ भोवड, प्रभाकर अ.भोवड, तुकाराम सि. भोवड, पांडुरंग ना.भोवड आणि कार्यकारिणी समिती, सल्लागार सभासद व ग्रामस्थ यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











