संत कक्कय्या समाजाचे ७ जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे अंदोलन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-संत कक्कय्या समाजा ला आर्थिक विकास महामंडळ मिळावे आणि माजी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेल्या अश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी संत संत कक्कय्या समाजाचे एक दिवशीय धरणे अंदोलन आझाद मैदान येथे ७ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
  • संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे म्ह णून वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई, मार्फत मागी ल वर्षी २८/६/२४ रोजी धरणे अंदोलन आयोजित केले होते.
  • त्या अंदोलन साठी राज्यातील सर्व समाज बांधव, भगिनी, संस्था,महासंघ,संघटना अशी सर्व घटक सहभागी झाले.
  • त्यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात संत कक्कय्या समाजाला सुद्धा महामंडळ दिले जाईल असे जाहीर केले.
  • परंतु एक वर्ष उलटून गेली तरी त्याची पूर्तता केली नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या घोषणे नुसार कल्या ण मंडळ पदाधिकारी सतत प्रशासकीय यंत्राने बरोबर संपर्कात होते.
  • परंतु काही कारणाने शासन निर्णय पारित झाला नाही. अ धिवेशना नंतर निवडणूक जाहीर झाली,मंत्रिमंडळ बदल झाला.
  • मागील एक महिन्या पासुन कल्याण मंडळाचे पदाधिकारी नवनियुक्त समाज कल्याण मंत्री मा संजय शिरसाट यांचे शी आणि त्यांचे सचिव ह्या सर्व मंत्री महोदय तसेच प्रशास कीय अधिकारी या सर्वांशी विविध स्तरावर चर्चा करीत आहेत.
  • परंतु सकारात्मक निर्णय सरकार घेत नाही. त्यामुळे दि. ३ जून रोजी कल्याण मंडळ यांनी जाहीर सभा आयोजित केली यावेळी ४० हून अधिक सभासद विविध जिल्ह्यातून उपस्थित होते.
  • कल्याण मंडळ मार्फत सविस्तर उपरोक्त माहिती सभे मध्ये देण्यात आली.
  • सर्व उपस्थित समाज बांधव यांची मागणी नुसार पुन्हा ए कदा धरणे अंदोलन करण्यात यावे अशी जोरदार मागणी झाली.
  • या सर्व सभासदाच्या मागणीचा विचार करता पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी, संत कक्कय्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी वीरशैव कक्कया कल्याण मंडळ यांनी सोमवार दि.७ जुलै २०२५ रोजी आझाद मैदान येथे धरणे अंदोलन आयोजित केले आहे.
  • आपल्या हक्काचे महामंडळ मिळवण्यासाठी संत कक्क य्या समाजातील सर्व बांधवानी पुन्हा एकदा आझाद मैदा न येथे धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन वी रशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई कडून करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles