
फेम इंडिया–एशिया पोस्टच्या यादीत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे…! रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा; महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश.
- प्रतिनीधी : रत्नागिरी : :- फेम इंडिया–एशिया पोस्टने प्र सिद्ध केलेल्या ताज्या यादीत महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ही समावेश झाला आहे.
- या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

- कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे, गुन्हेगारीवर नियंत्र ण ठेवणे, सक्षम नेतृत्व, नागरिकाभिमुख पोलीसिंग आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे, अशा विविध निकषांच्या आधारे या यादीसाठी नि वड करण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
- पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात जि ल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था सक्षम ठेवण्यासोबतच नाग रिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवा ही करण्यावर भर दिला जात आहे.
- पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन कर ताना नागरिकांशी संवाद आणि विश्वासाचे नाते दृढ कर ण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे.
- भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्या तील विविध आव्हानांवर मात करत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.
- फेम इंडिया–एशिया पोस्टच्या मानाच्या यादीत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा समावेश होणे ही त्यांच्या कार्याची दखल मानली जात असून, रत्नागिरी जि ल्हा पोलीस दलासाठीही ही अभिमानाची बाब आहे.
- या निवडीमुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्म चाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






