परंडा तहसीलमधील विविध विभागातील खातेनिहाय सखोल चौकशी करा, 15 ऑगस्टला मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांचा इशारा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तहसील का र्यालयातील कारभार आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हा ट्यावर आला आहे.
  • तब्बल अडीच वर्षांपूर्वी विकल्या गेलेल्या शासकीय वाह नाच्या दुरुस्तीवर 15 हजार, त्याच वाहनासाठी 10 हजारां चे टायर अन चक्क 11 लाख 12 हजार 982 रुपयांच्या डिझेल खरेदी झाल्याच्या बातम्या आल्या असून, त्याची पूर्ण आणि गेल्या अडीच वर्षांपासूनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यां नी केली आहे.
  • या प्रकरणासह तहसील कार्यालयातील इतर विविध विभा गांतील कथित भ्रष्टाचाराची अडीच वर्षांपासूनची सखोल चौकशी न झाल्यास येत्या 15 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई तील मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेख यांनी महसूल व वन विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे दिला आहे.
  • काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, या प्रक रणाची एप्रिल 2025 पासून (म्हणजेच केवळ एका वर्षा ची) चौकशी करण्याची मागणी पुढे आली होती.
  • तसेच इतर विभागांतील गैरकारभाराची चौकशी का नको ? तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार केवळ वाहनापुरता मर्यादित नसून तो कोपऱ्या-कोपऱ्यात पसरल्याचा दावा करत त्यांनी खालील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे मुद्दे उचल ले आहेत.
  • (१)त्यांच्या मुळ पगारापेक्षाही जास्त प्रवास भत्ता (TA) लाटला असून, गेल्या 10 वर्षाच्या प्रवास भत्याची सखोल चौकशी करा.
  • (२)संजय गांधी इंदिरा गांधी योजना: गेल्या 10 वर्षातील या योजनांच्या नकला आणि फायली रेकॉर्ड रूममध्ये ज मा नाहीत, त्या गायब आहेत…?
  • (३) धान्य गोदाम व CCTV : पुरवठा विभाग व गोदामाती ल सीसीटीव्ही फुटेजची तपासणी का नाही….? चौकशी करा.
  • (४)बनावट उत्पन्न प्रमाणपत्रे व जमा-खर्च प्रकरणी बैंक ऑनलाइन पेमेंट खात्यांची तपासणी प्रलंबित आहे.
  • चौकशी का केली नाही? तलाठी अहवाल नसताना 21 ह जाराचे उत्पन्न देण्यात आले, कसे?( कोणाच्या आदेशाने देण्यात आले?) सखोल चौकशी करा .
  •  (५) जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची अनाम त रक्कम,नामनिर्देशन पत्रिका, मतदार याद्या, त्याची रक्क म पूर्णपणे शासन जमा का झाली नाही….? चौकशी का नाही?
  • (६) नैसर्गिक आपत्ती अनुदान : शेजारील 5 जिल्ह्यांत आ पत्ती अनुदानात गैरव्यवहार उघडकीस आले असताना परंड्यात गेल्या 2-3 वर्षांत त्याची पारदर्शक तपासणी का झाली नाही?
  • भ्रष्टाचाराचा अकरा लाखाचा आकडा काही बातमीमध्ये अचानक कमी दाखविण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे. भ्रष्टाचार हा शेवटी भ्रष्टाचारच असतो.
  • गाडी अडीच वर्षापूर्वी विकली गेली असेल, तर चौकशीही अडीच वर्षांपूर्वीपासूनच झाली पाहिजे. केवळ गेल्या आ ठ-नऊ महिन्यांतील कारभाराची चौकशी करून चालणार नाही.
  • या काळात बदललेले 3 ते 4 लेखा लिपिक आणि वाहन चालक त्यांचीही कसून चौकशी झाली पाहिजे, असा आ क्रमक पवित्रा फारुख शेख यांनी घेतला आहे.
  • संबंधित कर्मचाऱ्यांची पदोन्नती अन् बदल्या रोख. !शासन निर्णयानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान पदोन्नतीची प्र क्रिया सुरु असते.
  • त्यामुळे परंडा तहसीलच्या लेखा विभागात तीन महिन्यांत चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतीही पदोन्नती देऊ नये, तसेच आपती व्यवस्थापन विभागाची चौकशी पूर्ण होईप र्यंत बदल्या झालेल्या कर्मचायांना कार्यमुक करू नये, अ शी ठाम मागणी पत्रात करण्यात आली आहे.
  • प्रशासनाने या सर्व गंभीर प्रकरणांची तात्काळ आणि नि ष्पक्ष चौकशी न केल्यास 15 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आल्याने महसूल खात्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles