
मॉडर्न हायस्कुलच्या मुलींचे अपंग सैनिकांसोबत रक्षाबंधन.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबीके :-प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सो सायटीच्या मॉडर्न हायस्कुल निगडी येथील स्काऊट गाईड आणि मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिरच्या मुलींनी अपंग सैनि क पुनर्वसन केंद्रातील सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

- देशसेवा करताना युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांचा त्याग पाहून तसेच त्यांच्याकडून शौर्याच्या कथा ऐकून मु लींमध्ये सैनिकांबद्दलचा आदरभाव अधिक दृढ झाला.
- यावेळी देशभक्तीपर गीत सादर केले.मुलींनी सर्व सैनिकां चे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या.
- यावेळी प्राचार्या शारदा साबळे,पर्यवेक्षक विजय पाचारणे, आशा कुंजीर,शिवाजी अंबिके,नवेश पाटील,उमर शेख उप स्थित होते.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमो द शिंदे, सदस्य राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











