माळशिरस च्या नगरसेविका रेश्माताई टेळे झाल्या विधीज्ञ.

  • प्रतिनीधी : योगेश सुळे :- माळशिरस नगरपंचायत च्या विद्यमान नगरसेविका रेश्माताई सूर्यकांत टेळे यांनी वकि ली क्षेत्रामध्ये पदवी मिळवली आहे.
  • यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तरंगफळ येथील प्रा थमिक शाळा व श्रीनाथ विद्यालय तरंगफळ या ठिकाणी झाले.
  • त्यानंतर ज्युनिअर कॉलेज हे सायन्स मधून दयानंद कॉले ज सोलापूर येथे व लग्नानंतर बीए डिग्री मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी करण्यात आले.
  • प्रेग्नेंसी मध्ये त्यांनी बीए शिक्षण कम्प्लीट केले. त्याच बरो बर त्यांचे एल एल बी शिक्षण त्यांनी प्रियदर्शनी ज्ञानप्रबो धिनी लॉ कॉलेज फलटण या ठिकाणी पूर्ण केले हे शिक्षण सुद्धा अशाच धावपळीच्या आणि व्यस्त वातावरणात पूर्ण केले.
  • एल एल बी चे शिक्षण घेण्यापूर्वीपासून त्या माळशिरस न गरपंचायतीवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. वकील होणे हे त्यांचे पहिल्यापासून चे स्वप्न होते.
  • परंतु धनगर समाजात मुलींच्या शिक्षणाला आजही फार महत्त्व देत नाहीत.
  • परंतु रेशमाताईंच्या स्वपनाला खऱ्या अर्थाने पंख दिले आणि ते सत्यात उतरवले ,ते म्हणजे त्यांचे मार्गदर्शक पती सूर्यकांत उर्फ सुरेश भाऊ टेळे यांनी रेश्माताईंच्या जडणघ डणीत सुरेश भाऊंचा सिंहाचा वाटा आहे.
  • एक स्त्री घर आणि मुलं सांभाळते अशी धारणा असले ल्या समाजासमोर रेश्मा ताईंनी एक नवा आदर्श घालून दि ला आहे तो म्हणजे घर व मुलं सांभाळत राजकीय सामा जिक क्षेत्रात आर्थिक हातभार म्हणून मेडिकल सांभाळत त्यांनी एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले.
  • एल एल बी चे शिक्षण घेत असताना त्यांना खूप मोठ्या संघर्ष करावा लागला, त्यात ऐन परीक्षेच्या काळात त्यांचे नगरसेविका पद घालवले होते पण त्या जिकिरीने लढल्या आणि प्रत्येक संकटावर मत केली आहे.
  • पहाटे सकाळी लवकर उठून स्वयंपाक व मुलांच्या आवरू न त्या सकाळी सात वाजता माळशिरस ते फलटण असा बसचा प्रवास तीन वर्ष केला.
  • कॉलेज व कॉलेजच्या ऍक्टिव्हिटी त्यांनी पूर्ण केल्या कॉले ज नंतर घरी येऊन मेडिकल सांभाळून मुलांचा अभ्यास घेणे घरात स्वयंपाक त्याचबरोबर नातेवाईकांची जबाबदा री तसेच राजकीय सामाजिक जबाबदारी सांभाळणे हे स र्व एका सामान्य स्त्रीला असामान्य बनवते हे रेश्मा ताईंच्या संघर्षमय जीवनातून प्रकर्षाने दिसून येते.
  • रेश्मा ताईंचे माहेर तरंगफळ या संपूर्ण गावामध्ये आज पर्यंतच्या कालावधी मधील पहिली महिला वकील म्हणून वकीली क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
  • त्याचबरोबर त्यांच्या सासरी टेळे परिवार व नातेवाईक या तील त्या पहिल्या महिला वकील झाल्या आहेत त्याचबरो बर सर्वसामान्य घरातून आलेल्या रेश्मा ताई, नगरसेविका म्हणून सुद्धा माहेरी ,सासरी आणि नातेवाईक यांमधील पहिल्या राजकीय क्षेत्रातील यशस्वी महिला म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद राहिलेले आहे व स्वतःच्या कामाला स्व तः न्याय देणे ही त्यांची खासियत आहे.
  • सृजनशील विचारांच्या रेश्मा ताई यांना लहानपणापासून मदतीचा हात पुढे करण्याची सवय होती परंतु त्याला यो ग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
  • ते त्यांचे पती सुरेश भाऊ सामाजिक कार्यकर्त्यापासून सु रू झालेला त्यांचा प्रवास राजकारणापर्यंत आणि तिथून पुढे वकील क्षेत्रात न्यायदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय व्हा वा अशा त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles